‘मुंबई पुणे मुंबईची’ पन्नाशी
चंद्रकांत शिंदे
आजच्या तीन दिवसा चित्रपट चालण्याच्या युगात मराठी चित्रपटांनी 50 दिवस पूर्ण करणे म्हणजे गोल्डन ज्युबली साजरी करण्यासारखेच आहे. आज हिंदी चित्रपट प्रदर्शित होतात ते फक्त शुक्रवार, शनिवार आणि रविवार जास्तीत जास्त व्यवसाय कसा होईल हे पहातात. या तीन दिवसांवर चित्रपटाचे भवितव्य ठरते.
अशा परिस्थितीत जेव्हा एक मराठी चित्रपट पन्नास दिवस पूर्ण करतो तेव्हा तो एक विक्रमच म्हणायला हवा. स्वप्नील बर्वे व मुक्ता बर्वे या दोघांवर चित्रित केलेल्या पुणे मुंबई पूणे चित्रपटाने हा विक्रम केला आहे.
कथा, निर्मिती, दिग्दर्शन व छायाचित्रण, अभिनय यात सरस असणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हमखास यशस्वी होतात. पण त्यात जर एखाद्या निर्माता-दिग्दर्शकाने दोनच व्यक्तीरेखांवर संपूर्ण चित्रपटाचा डोलारा उभा करुन वेगळा प्रयत्न यशस्वी करण्याचे धाडस केले असेल तर, त्याचे कौतुक ते निराळेच!
सतीश राजवाडेने असे धाडस केले आणि आज सातव्या आठवड्यातही प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलची पाटी लावण्यात हातभार लावलेला आहे.
मुंबई पुणे मुंबई चित्रपटाचा फ्रेश लुख, हलकी फुलकी प्रेमकथा प्रेक्षकांना पुण्याच्या लोकेशन्सवर फेरफटका मारुन दोन घटका निखळ करमणूक करण्यात यशस्वी ठरली आहे.
मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी या दोघांनीही मुंबई-पुण्याच्या व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारल्या आहेत. दोघांच्या अफलातून केमेस्ट्रीमुळे सतीश राजवाडेंचा हा हटके प्रयत्न यशस्वी झाला आहे.
लेखक पराग कुलकर्णी आणि सतीश राजवाडे यांनी आजच्या तरुणाईची मानसिकता, लग्न संस्काराविषयीचे मत, त्या विषयीचे विचार अतिशय तरलतेने मांडण्याचा प्रयत्न केला असून, तो प्रेक्षकांना खुपच भावत आहे . 11 जूनला रिलिज झालेल्या या चित्रपटाला सलग सातव्या आठवड्यात प्रेक्षकांची दाद मिळत आहे. ही नक्कीच कौतुकाची बाब आहे. हा चित्रपट पहिल्या आठवड्यात राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये प्रदर्शित झाला होता.