अजिनोमोटोमुळे मायग्रेन आजार होतो
डॉ. दीपक सावंत यांची माहिती
डोकेदुखीशी संबंधित असलेला मायग्रेन हा आजार धूम्रपान, तंबाखू आणि अल्कोहोलमुळे होत नसून अजिनोमोटो आणि कॉफीमुळे हा आजार होत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत दिली. तसेच अजिनोमोटो असलेले पदार्थ खाऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. सर्वसाधारणत: सर्व चायनीज पदार्थामध्ये या पदार्थाचा वापर होतो तेव्हा तसे पदार्थ खाणे टाळावेत.
विधानसभेत आमदार मिलिंद माने यांनी विचारलेल्या लक्ष्यवेधीच्या प्रश्नावर डॉ.दीपक सावंत बोलत होते. मायग्रेन हा आजार पौगंडावस्थेत होतो. मुलींमध्ये त्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर आहे. 15 टक्के लोकांमध्ये हा आजार आढळतो. एकटय़ा नागपूरमध्ये 3 लाख 60 हजार लोकांना या आजाराची लागण झालेली आहे. तसेच मायग्रेन असणार्या दोनतृतीयांश लोकांच्या कुटुंबात हा आजार आढळून आला आहे.
मायग्रेन आजाराचे प्रमाण कामगार आणि कष्टकर्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर आढळून आले आहे. त्यामुळे कामगार रुग्णालयात मायग्रेनवर उपचार करण्यासाठी विशेष विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी बैठक झाली आहे. परंतु केंद्र शासनाची मार्गदर्शक तत्त्वे अस्पष्ट असल्याने त्याबाबत केंद्राशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सावंत म्हणाले. तसेच कामगार रुग्णालयाचे नियंत्रण केंद्र शासनाकडे असावे की राज्य शासनाकडे यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर आम दार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी योगामुळे मायग्रेन बरा होत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे योगा केंद्र निङ्र्काण करण्याचा सरकारचा विचार आहे का असा सवाल केला. त्यावर याबाबतची माहिती तपासून निश्चितच योगा केंद्रे सुरू करण्याचा विचार करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.