'अॅक्यूप्रेशर'ने रोग दूर पळवा!
'
अॅक्यूप्रेशर' म्हणजे करंगळी, अंगठा किंवा कोणत्याही वस्तूने दबाव देऊन शरीरास निरोगी राखण्याची पध्दती होय. या चिकित्सा पध्दतीने आपली रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होत असून आपण नेहमी ताजेतवाने दिसू शकतो. 'अॅक्यूप्रेशर' या पध्दतीने आपल्या शरीरात विद्युत प्रवाहाचे नियंत्रण केले जात असून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते.
आपले शरीर पंच महाभूतांपासून अर्थात पृथ्वी, जल, अग्नि, वायू व आकाश, अशा पाच तत्त्वांनी बनले आहे. या पाच तत्त्वांच्या माध्यमातून आपल्या शरीरातील उर्जेचे नियंत्रण केले जात असते. ही प्राणशक्ती जीवन बॅटरी आपल्या शरीरात गर्भधारणेच्या वेळी स्थापीत होत असते. यामुळे चेतनारूपी विद्युत प्रवाह उत्पन्न केले जात असतात. आपल्या शरीरात विद्युत प्रवाह जर सुरळीत होत असेल तर आपले शरीर स्वस्थ राहते. या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास आपल्याला अस्वस्थ वाटत असते. 'अॅक्यूप्रेशर' या पध्दतीने आपल्या शरीरात विद्युत प्रवाहाचे नियंत्रण केले जात असून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते.
जेवण करण्यापूर्वी अथवा जेवण झाल्यानंतर एक तासांनी आपण 'अॅक्यूप्रेशर' चिकित्सा करू शकतो. दिवसभरातून एक ते दोन वेळा आपण ह्या पध्दतीचा वापर करू शकतो.