- लाईफस्टाईल
» - आरोग्य
» - आरोग्य लेख
उन्हाळा, फळ आणि आरोग्य
आंबा : उन्हाळ्यात आंबा जरूर खावा. कैरीत गॅलिक एसिडमुळे आंबटपणा असतो. पिकल्यामुळे आंब्याचा रंग पिवळा होतो. हाच पिवळ्या रंगाचे कॅरोटीन शरीरात जाऊन जीवनस्तव 'अ'मध्ये परिवर्तित होतो. शिवाय क जीवनसत्वही मिळते. सेवन करणे केव्हा टाळावे : उपाशी पोटी आंब्याचे सेवन करणे टाळावे. जास्त सेवन केल्याने रक्त विकार, बद्धकोष्ट आणि पोटात गॅस तयार होतो. कैरी जास्त प्रमाणात खाल्याने गळा दुखणे, अपचन, पोटदुखी होऊ शकते. कैरी खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे टाळावे. मधुमेहींनी हे फळ खाणे टाळावे. खाण्याअगोदर आंब्याला थंड पाण्यात किंवा फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे. त्याने त्यात असलेली उष्णता कमी होते.उपयोग : हे शक्तीवर्धक, स्फूर्तिदायी असून शरीराची कांती वाढवण्यास मदत करते. सायट्रस फळे : या श्रेणीत लिंबू, मोसंबी, संत्री इत्यादी फळं येतात. यात प्रामुख्याने व्हिटॅमिन 'सी' आणि काही मात्रेत कॅरोटीन असतात. खासकरून तापात, थकवा आणि लिव्हरचा त्रास असलेल्य लोकांना या फळांचा रस फायदेशीर असतो. सेवन करणे केव्हा टाळावे : सर्दी, खोकल्यात लिंब कोणत्याही फॉर्ममध्ये खाऊ नये. मूत्र विसर्जन जास्त होत असल्यास आणि हागवण लागल्यास मोसंबी खाणे टाळावे. मोसंबीला जास्त चोखण्याने दात खराब होण्याची शक्यता असते. सकाळी उठल्यावर व झोपताना संत्र्याचे सेवन करणे टाळावे. उपयोग : पित्त, दमा, श्वास, जुलाब, चक्कर, बद्धकोष्ट, लट्ठपणा या आजारांवर गुणकारी. बेल : या फळात भरपूर मात्रेत पेक्टिन, टॅनिन आणि म्युसिलेजिनस हे पदार्थ असतात. ते डायरियात लाभदायी आहेत. केव्हा खाणे टाळावे : अर्धपिकलेले फळ खाऊ नये. उपयोग : पोटाशी निगडीत सर्व प्रकारचे आजार, कावीळ, मधुमेह, दात आणि डोळ्यांच्या आजारांवर लाभदायक आहे. टरबूज : उन्हाळ्यात या फळाचे सेवन करणे फारच हितकर असते. केव्हा खाणे टाळावे : अर्धवट चिरलेले टरबूज खाणे टाळावे. खाल्यानंतर किमान एक तास त्यावर पाणी नाही प्यायला पाहिजे. उपयोग : चक्कर, पित्त, कावीळ, उन लागल्याने आलेला ताप या आजारांवर फायदा होतो. द्राक्ष : यात ग्लूकोज भरपूर असल्यामुळे हे खाल्याने लगेचच ऊर्जा प्राप्त होते. केव्हा खाणे टाळावे : उपाशी पोट खाणे टाळावे. एका दिवसात 50 ते 75 ग्रॅमपेक्षा अधिक द्राक्ष खाणे टाळावे. उपयोग : एलर्जी, एनीमिया, कँसर, मोतिबिंदू, हृदयरोग, कावीळ, स्त्रियांशी संबंधित आजार, सर्दी-पडसे, बद्धकोष्ट, टीबी, तापासारख्या आजारांवर हे लाभकारी आहेत. जांभूळ : पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे उन्हाळ्याचे हे खास फळ आहे. कार्बोहाइड्रेट, कॅल्शियम आणि फास्फोरस अधिक असल्यामुळे हे फळ बर्याच रोगांवर गुणकारी आहे. हे फळच नव्हे तर यात असलेल्या बिया, पानंसुद्धा फायदेशीर आहेत. केव्हा खाणे टाळावे : जांभळासोबत कधीही दूध पिऊ नये. त्याने पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. हे फळ नेहमी जेवणानंतर घ्यावे. यात वातदोष असल्यामुळे वाताच्या रोग्यांना थोडी सावधगिरी बाळगायला पाहिजे. उपयोग : पोटाशी संबंधित आजार, उल्टी, जुलाब, ल्यूकेमिया, पिंपल्स इत्यादी आजारांवर फायदा होतो. तसेच मधुमेहींना या फळाचे सेवन केल्याने विशेष फायदा मिळतो. आवळा : व्हिटॅमिन 'सी' असल्याने आवळा फारच फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने थकवा दूर होतो व स्मरणशक्तीत वाढ होते. केव्हा खाणे टाळावे : प्रकृती थंड असल्यामुळे थंडीत कच्चा आवळा उपाशी पोटी सकाळी व रात्री खाणे टाळावे. उपयोग : हृदयरोग, डोळ्यांचे आजार, मधुमेह, उच्च रक्तदाप, बद्धकोष्ट, पाइल्स आणि गर्भावस्थेत हे फारच गुणकारी आहे. खरबूज : यात व्हिटमिन 'अ' आणि पोटेशियमसारखे बरेचसे खनिज घटक असतात. याचे सेवन केल्याने रक्तकल्पक्ता कमी होते व उन्हापासून बचाव होतो. केव्हा खाणे टाळावे : याचे अधिक सेवन केल्याने पोट आणि आतड्या कमजोर होतात. याचे सेवन केल्यानंतर किमान 1 ते 2 तास पाणी व दूध घेणे टाळावे. उपयोग : हृदय रोग, कावीळ, मूत खडा, छातीत दुखणे आणि उन लागल्यावर याचे सेवन फायदेशीर असते.