1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2016 (12:33 IST)

कोरफड (एलोविरा)चे औषधी उपयोग (2)

alovira
कोरफडीच्या गरामध्ये ए, बी १, बी ६, बी १२ अशा अनेक व्हिटॅमिन्सचा समावेश समावलेला आहे. या गरासोबत मध व हळद पूड एकत्र करून घेल्यास कफ, खोकला, सर्दी व घशाचे अन्य विकार समूळ नष्ट होतात.
 
लहान मुलांच्या कफावर कोरफड फार उत्तम गुण देते. कोरफडीची पाने विस्तवावर थोडी गरम करुन त्याचा अंगररस काढावा आणि त्यात किंचिंतसे मीठ टाकून लहान मुलास पिण्यास द्यावे. म्हणजे परसाकडे साफ होऊन कफ नाहीसा होतो.
 
कोरफडीचा एक ते दीड चमचा रस साखर घालून नियमितपणे घेतल्यास शरीरात चांगली शक्ती होते.
 
कोरफडीच्या पानांच्या रसात थोड्या प्रमाणात नारळाचे तेल घेऊन कोपरे, गुडघे व टाचांवर लावल्याने त्या जागेवरचा काळेपणा कमी होतो.
 
मूळव्याधीमुळे वेदना होत असल्यास किंवा आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा नुसता गर ठेवण्याने बरे वाटते.
 
सांधेदुखी आणि अंगदुखीने पीडित असणार्‍यांनी कोरफड रसाचे सेवन केल्यास आराम मिळतो. यामुळे शरीरात अँटीबॉडीज घटक आणि पांढर्‍या रक्तपेशी निर्मिती होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे सूज कमी होण्यास मदत होते. मुक्का मार लागलेल्यावर देखील कोरफड उपयुक्त ठरते.
 
मूत्रपिंडाशी संबंधित संसर्गात (युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन) कोरफड जेल गुणकारी ठरतो.एखाद्याला अशी समस्या असल्यास कोरफडीच्या ताज्या जेलमध्ये पाणी आणि साखर मिक्स करून रस तयार करावा. हा रस पिल्यास संसर्गाची समस्या दूर होते. सोबत लघवीवेळी होणारी जळजळ कमी होते.
 
एखादा अवयव लचकल्यास कोरफडीच्या ताज्या गरात थोडी हळद आणि सैंधव मीठ टाकून हलके गरम करावे. हे मिश्रण लचकलेल्या भागावर बांधावे.
 
जळालेल्या किंवा चटका बसलेल्या भागावर तत्काळ कोरफडीचा ताजा गर लावल्यास फोड येत नाहीत, त्वचा पूर्ववत होते..
 
मायग्रेनने डोकेदुखी होत असल्यास कपाळावर कोरफड जेल लावावा. लगेच आराम मिळतो.
 
पोटदुखी होत असल्यास कोरफडीच्या गरावर थोडेसे मीठ टाकून खाल्ल्यास पोटाला आराम मिळतो.