शनिवार, 25 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

खा, पण जरा जपून

खा
ND
आपले शरीर निरोगी राखण्यासाठी नेहमी पोषक आहार घ्यावा. आपल्या शरीराला पोषक अन्नपदार्थांची कमतरता भासल्यास आरोग्यात बिघाड होण्याची दाट शक्यता असते. योग्य प्रमाणात प्रोटीन आणि कॅलरीज मिळाल्यास अशा प्रकारचा त्रास होणार नाही. लोकांमध्ये डायटींगचा प्रकार अधिक वाढत असल्यामुळे बाजारात कमी कॅलरीज आणि शुगर फ्री खाद्यपदार्थांनी गर्दी केली आहे. त्यापैकी काही खाद्यपदार्थ आरोग्यवर्धक आहेत. पण काही पदार्थांमध्ये जीवनसत्वाची कमतरता असल्याचे दिसून येते.

भारतीय लोकांमध्ये पॅक किंवा डबा बंद जेवण करण्याची पद्धत अस्तित्वात नसून त्यांना गरम गरम आणि ताजे खाणे आवडते. ताजे आणि गरम खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे आपली पचन क्रिया सुरळीत होण्यास फायदा होतो. तसेच, ते शरीराला पोषकही असते. परंतु, आजच्या धावपळीच्या युगात कुणाला गरम गरम खायला सवड नसून आरामाने एका जागेवर बसून खाणेदेखील शक्य होत नाही. बहुतांश लोक पिझ्झा, बर्गर, वडापाव आणि इतर स्नॅक्स खाऊन आपले पोट भरतात. त्यामुळे पोटाचे आजार शरीराला जडतात आणि मग त्यानंतर व्यायाम, योग अशा प्रकारचा पर्याय अवलंबताना दिसून येतात. सर्वांत सोपा उपाय म्हणजे, पोटभर खाऊन दिवसभर काम केल्यास कोणत्याही प्रकारचा रोग जडत नाही. आणि व्यायाम करण्याचीही गरज नाही.

राहणीमानात झालेल्या बदलांमुळे आपले जीवन यंत्रवत बनले असून त्याचा आपण विचारही करत नाही. तरीही आता योग आणि फिटनेसचा ट्रेंड आला त्यामुळे सर्वांना फिट राहणे आणि कॅलरीज प्रमाणात ठेवण्याची जाणीव व्हायला लागली आहे हेही नसे थोडके. विशेष म्हणजे, लहान मोठ्या शहरात ही क्रेज पसरली. लोकांनी फळे आणि ताजा भाजीपाला खाण्यावर भर दिला आहे.

आइसक्रिम, केक, चॉकलेट, फरसाण, बिस्कीट, गुलाबजाम आणि रबडी तसेच कचोरीपासून भातापर्यंत बाजारात उपलब्ध असलेले सर्व खाद्यपदार्थ लो कॅलरीज आणि लो कोलेस्ट्रोलच्या रूपात आहेत. अशा प्रकारचे पदार्थ खाण्याचे टाळावे. युवकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात आरोग्यदायक पेय (हेल्थ ड्रिंक्स) विकले जातात. त्यापासून नेहमी सावध रहावे.

खाली दिलेल्या काही टिप्स लक्षात ठेवून खरेदी करा.

1. खाद्यपदार्थांत समाविष्ट करण्यात आलेल्या घटक पदार्थांची नावे योग्य प्रकारे दर्शविले नसल्यास तो पदार्थ विकत घेऊ नये.

2. 'कितीही खा, काहीही होणार नाही' असे सांगितल्यावरही तो पदार्थ सावधगिरीने विकत घ्यावा. अन्यथा खाऊ नये.

3. वजन कमी करण्यास उपयुक्त आणि त्यासाठी काहीही करावे लागणार नाही.

4. अशा प्रकारच्या पदार्थांपासून आपल्या शरीराला ताबडतोब आराम मिळेल, असे सांगणार्‍या दुकानदारांकाडून खाद्यपदार्थ विकत घेऊ नये.

5. आपल्या उत्पादनाबाबत एखाद्या प्रमाणित व्यक्ती‍/विशेषज्ञांबद्दल माहिती देत नसल्यास किंवा प्रमाणित सीलबंद नसल्यास तो पदार्थ विकत घेऊ नये.

6. आपल्या उत्पादनाविषयीची रेसिपी किंवा घटक पदार्थ (इनग्रेडियएंट्स) लपवून ठेवत असल्यास तो पदार्थ विकत घेऊ नये.

7. आपल्या उत्पादनाचा प्रचार करताना एखाद्या अन्य खाद्यपदार्थोंची केस हिस्ट्री किंवा एखाद्या व्यक्तीच्या नावाचा वापर करत असल्यास त्याचा उपयोग करू नये.

8. दुकानदार अशक्य असल्यास शक्य करण्याचा दावा करत असल्यास त्याच्या दुकानातून खाद्यपदार्थ विकत घेऊ नये.