1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

ताप, अंगदुखी विकार असल्यास

स्नायू दुखणे
* गरम पाण्यात मीठ टाकून दुखावलेला भाग शेकावा.
* दुखावलेल्या भागास रॉकेल लावून वर फडके गुंडाळावे.
* टर्पेंटाइन तेल, मेंथॉल लावावे.
* कडुलिंबाच्या बियांचे तेल दुखणार्‍या भागास चोळावे.

अंग दुखून ताप येणे, पाडसे-फ्ल्यू
* तुळशीची पाने 5/6, बेलाची पाने 3/4, सुंठ छोटा तुकडा, खडीसाखरेचा 1 खडा, थोडे जिरे, धने, पारिजातकाची 4/5 पाने, गवती चहाची 2/3 पाने, 2/3 भांडी पाणी घालून काढा करून उकळत ठेवावा. 1 भांडे काढा ठेवावा. रात्री गरमागरम पिऊन पांघरूण घेऊन झोपावे. दरदरून घाम येईल. आराम वाटेल.
* त्रिभुवन कीर्तिच्या 2 गोळ्या तुळशीच्या पानाबरोबर घ्याव्या. दिवसातून 3 वेळा 4 दिवस घ्याव्यात. काळ्या मनुका खाऊन मग पाणी प्यावे.

ताप येऊन डोके दुखते तेव्हा
* वेखंडाची कांडी पाण्यात उगाळून तिचा डोक्याला लेप द्यावा. लहान मुलांच्या अंगाला लेप लावावा.

संधिवात
* वडाची पाने गरम करून दुखर्‍या अवयवाला तेल लावून, पाने गच्च फडक्याने रात्री बांधून ठेवावी. सांधे सैल पडतात.
* काळ्या तुळशीच्या पानांची वाफ दुखर्‍या अवयवाला देणे.

सर्दी
* विड्याच्या पानांचा रस 2 चमचे व मध 1 चमचा मिसळून सकाळी व सायंकाळी घ्यावा.

ताप
* नारळाचे पाणी, साखरपाणी, गोड ताक, विड्याच्या पानांचा रस 1 चमचा, आले पाव चमचा, मध 1 चमचा देणे.
* गुलाब पाणी, थंड पाणी व मीठ यांची पांढरी पट्टी कपाळावर ठेवावी.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा