1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
  6. आज तुमचा वाढदिवस आहे (11.03.2013)

Free Astrology, Jyotish, Grahman, Vastu | आज तुमचा वाढदिवस आहे (11.03.2013)

वाढदिवस
WD
दिनांक 11ला जन्म घेणार्‍या व्यक्तींचा मूलक 1+1= 2 असेल. अकराची संख्या आपसात मिळून दोन होते म्हणून तुमचा मूलक 2 आहे. या मूलकाला चंद्र ग्रह संचलित करतो. चंद्र ग्रह मनाचा कारक ग्रह आहे. तुम्ही भावुक प्रवृतीचे आहात. स्वभावाने तुम्ही संशयी असता. दुसर्‍यांचे दु:ख तुमच्याकडून बघवत नाही.

तुम्ही मानसिकरूपेण स्वस्थ असता पण शारीरिक शिथिलता असते. चंद्र ग्रह स्त्री ग्रह असतो, म्हणून तुम्ही फारच भावुक स्वभावाचे असता. तुमच्यात जराही गर्व नसतो. चंद्राप्रमाणे तुमच्या स्वभावात चढ-उतार येत असतो. जर तुम्ही घाईगडबड सोडली तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल.

शुभ दिनांक : 2, 11, 20, 29

शुभ अंक : 2, 11, 20, 29, 56, 65, 92

शुभ वर्ष : 2027, 2029, 2036

ईष्टदेव : महादेव, भैरव

शुभ रंग : पांढरा, हलका निळा, ग्रे

कसे राहील हे वर्ष

ज्या लोकांची जन्म तारीख 2, 11, 20, 29 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष अती उत्तम राहणार आहे. महत्त्वपूर्ण कामात नक्कीच यश मिळेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला सफलता मिळेल. नोकरी करणार्‍या व्यक्तींसाठी हा काळ प्रगतीकारक असेल. मानसिक सुख-शांती मिळेल. शुभवार्ता कानी पडेल. शत्रू प्रभावहीन होतील. बेरोजगारांना रोजगार ‍‍ मिळेल. व्यापारी वर्ग अनुकूल स्थितीत असतील. दांपत्य जीवन मधुर राहील.

मूलक 2च्या प्रभावात येणारे विशेष व्यक्ती
* महात्मा गांधी
* अमिताभ बच्चन
* हिटलर
* ‍लाल बहादूर शास्त्री
* थॉमस अल्वा एडिसन
* टीना अंबानी
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा