1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
  4. Marathi kavita rain

Marathi Kavita : प्रत्येक ऋतूची मजा घेऊ दे,समतोल राख, आतातरी!!

यंदा पावसाला अजिबात परतावस वाटेना,
उसंत कशी म्हणून घ्यावीशी वाटेना,
उगा हिंडतोय जिकडे तिकडे उनाड,
बळीराजा गेलाय वैतागून,पडे न उघाड,
कुठं पूर, कुठं धरणा च पाणीच पाणी,
नाकी नऊ आलं , थकला आता चाकरमानी,
पण पावसाला कुणाचीच दया येईना,
सोडून निघून जाईल, चिन्ह काही दिसे ना!
कर बाबा देवा आता तूच काहीतरी,
प्रत्येक ऋतूची मजा घेऊ दे,समतोल राख, आतातरी!!
...अश्विनी थत्ते
Published By -Smita Joshi
पुढील लेख
Skin Care Tips : ब्लीचिंग करण्यापूर्वी या 9 खास गोष्टी जाणून घ्या