शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचं निधन
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचं निधन, पुण्यातील राहत्या घरी वयाच्या 81 व्या वर्षी घेतला त्यांनी अखेरचा श्वास.
शरद जोशी यांचा जीवनपट
जन्म : ३ सप्टेंबर १९३५
जन्मस्थान : सातारा
वडील : स्व. अनंत नारायण जोशी
आई : स्व. इंदिरा अनंत जोशी
पत्नी : लीला (१९४३ - १९८२)
कन्या : सौ. श्रेया शहाणे (कॅनडा)
डॉ. गौरी जोशी (न्यू जर्सी, अमेरिका)
शिक्षण
प्राथमिक : रजपूत विद्यालय, बेळगाव
माध्यमिक : रुंगठा हायस्कूल, नाशिक व पार्ले-टिळक विद्यालय, विलेपार्ले (मुंबई)
एस.एस.सी : १९५१
बि.कॉम : १९५५, सिड्नहॅम महाविद्यालय, मुंबई
एम.कॉम : १९५७, सिड्नहॅम महाविद्यालय, मुंबई
सुवर्णपदक : बॅंकिंग विषयासाठी सी. रॅंडी सुवर्णपदक
IPS : IPS (भारतीय टपाल सेवा) परीक्षा उत्तीर्ण, १९५८
खासदार : राज्यसभेचे सदस्य
व्यवसाय
* कॉमर्स कॉलेज, कोल्हापूर येथे अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे व्याख्याता, १९५७-१९५८
* भारतीय टपाल सेवा, Class I अधिकारी. १९५८-१९६८
पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीत प्रवर्तक सहभाग.
* Chief, Informatics Servise, International Bureau, UPU
(Universal Postal Union), Bern, Switzerland 1968-1977
* शेती व वर्तमानपत्रीय स्तंभलेखन १९७७ पासून आजतागायत
संघटना कार्य
* मुलभूत उद्देश : व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजाच्या कारभारातील सरकारी हस्तक्षेप कमीत
कमी करणे
* शेतकरी संघटनेची स्थापना : १९७९
९ ऑगष्ट १९७९ रोजी चाकण येथे संघटनेच्या कार्यालयाचा शुभारंभ
* १९७९ पासून ’शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा,उस, तंबाखू,
दूध, भात, कापूस, इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे नेत्वृत्व, त्यासाठी वारंवार
उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने
* देशभरातील शेतकर्यांच्या अ-राजकीय संघटनांच्या समन्वय समितीची स्थापना :
३१ ऑक्टोंबर १९८२
* महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजराथ, राजस्थान,
कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, इत्यादी राज्यात शेतकरी आंदोलने
स्त्री प्रश्नांची मांडणी
* चांदवड (जि.नाशिक) येथे ९-१० नोव्हेंबर १९८६ रोजी अभूतपूर्व शेतकरी महिला
अधिवेशन. अधिवेशनात सुमारे दोन लक्ष महिलांची उपस्थिती.
* स्त्रीशक्तीच्या जागरणात स्त्री-पुरूषमुक्ती
* शेतकरी महिला आघाडीची स्थापना
* महिलांच्या राजकीय सहभागाची योजना
* महिलांच्या संपत्ती अधिकाराची फ़ेरमांडणी
* ’लक्ष्मीमुक्त’ अभियानाद्वारे स्त्रियांच्या नावे शेती करण्याचे, शेतकरी पुरूषांना
आवाहन (१९८९). प्रतिसादस्वरूप १९९१ पर्यंत लाखांवर स्त्रियांची नावे
जमिनीच्या सातबारा उतार्यावर नोंदविली गेली.
* दारूदुकानबंदी आंदोलन
* पंचायत राज्य बळकाव आंदोलन
संस्थात्मक कार्य
* संस्थापक अध्यक्ष
* कृषि-योगक्षेम संशोधन न्यास
* चाकण शिक्षण मंडळ
* शिवार अॅग्रो प्रॉडक्टस लि.
* भामा कन्स्ट्रक्शन्स लि.
राजकीय कार्य
* स्वतंत्रतावादाचा पुरस्कार करण्यासाठी ’स्वतंत्र भारत पक्षा’ची स्थापना (१९९४)
* देशाची राजकीय,आर्थिक व सामाजिक यंत्रणा पूर्णपणे बदलून टाकण्याची आवश्यकता
मांडणारा व त्यासाठी उपाययोजना सुचविणारा अनोखा, मतदारांना कोणतीही लालूच
न दाखविणारा किंबहुना, मतदारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा
निवडणूक जाहीरनामा
* स्वतंत्र भारत पक्षाचे खासदार (राज्यसभा) जुलै २००४ ते जुलै २०१०
विशेष पदनियुक्ती
* अध्यक्ष, स्थायी कृषि सल्लागार समिती, भारत सरकार (१९९० ते १९९१)
कॅबिनेट दर्जा. "राष्ट्रीय कृषिनीती " चा मसुदा
* राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे सदस्य १९९० पासून
* स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव आयोजन समितीचे सदस्य१९९७
* अध्यक्ष, कृषिविषयक कार्यबल, भारत सरकार (सप्टेंबर २००० ते जुलै २००१).
कॅबिनेट दर्जा. जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात देशाची अर्थनिती,
विशेषत: कृषिनीती कशी असावी याची शिफ़ारस करणारा अहवाल
* २००४ ते १० या खासदारकीच्या काळात संसदेच्या १६ विविध समित्यांचे सदस्य
जागतिक स्तर
* जागतिक कृषिमंच (World Agriculture forum) सेंट लुई (अमेरिका) च्या
सल्लागार मंडळाचे सदस्य १९९९ पासून.
* अर्थव्यवस्था, शेतीमाल व्यापार इत्यादी विषयांवरील परिसंवाद परिषदांसाठी
नियमित निमंत्रित.
लिखान/संपादन
* शेतकरी संघटनेचे पहिले मुखपत्र साप्ताहिक ’वारकरी’ चे संपादक व प्रमुख लेखक
* ’शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’ या पुस्तकाची हिंदी, गुजराती,
कन्नड व तेलगू भाषांतरे,
* द टाईम्स ऑफ़ इंडिया, बिझिनेस इंडिया, संडे, द हिंदु बिझिनेस लाइन, लोकमत
त्यादी नियतकालिकांमध्ये , दैनिकांमध्ये स्तंभलेखन,
* शेतकरी संघटनेच्या ’शेतकरी संघटक’ या पाक्षिक मुखपत्रासाठी २८ वर्ष व
’आठवड्याच्या ग्यानबा’ या साप्ताहिकासाठी २ वर्ष नियमित लेखन
पुरस्कार
१ सातारा भूषण: रा.ना.गोडबोले चॅरिटेबल ट्रस्ट तर्फ़े ११ वा सातारा भूषण पुरस्कार २०१०
२ महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार २०१०: ’अंगारमळा’ या पुस्तकासाठी
३ Agriculture Today या मासिकातर्फ़े दिला जाणारा पहिला
Agriculture Leadership Award 2008
४ चतुरंग प्रतिष्ठान, मुंबई ’जीवनगौरव पुरस्कार २०११’
संशोधन मार्गदर्शन
* तिसर्या जगातील आर्थिक दुरवस्थेचे अचूक निदान करून त्यावर उपचार सुचविणारा
विचार म्हणून शरद जोशींचा विचार व त्याच्या मान्यतेसाठी त्यांनी सुरू केलेल्या
शेतकरी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी, अनेक विदेशी विद्यापीठांतील संशोधकांनी
भारतात धाव घेतली. त्यांना शरद जोशींनी मार्गदर्शन केले.
ठळक नोंदी ’इंडिया-भारत’
* १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यामंतर देशाच्या सरकारने शेतकर्यांच्या
शोषणाची इंग्रज सरकारची वसाहतिक नीती चालूच ठेवली. त्यामुळे देशाच्या
जनतेमध्ये आधी आर्थिक व अनुषंगाने सामाजिक, सांकृतिक व मानसिक व्दैत तयार
झाले हे व्दैत अधोरेखित करणार्या ’इंडिया-भारत’ संकल्पनेचे उद्गाते
* विकसित देशांत शेती चालू राहण्यासाठी शेतकर्यांना भरघोस अनुदाने दिली जातात.
भारतात मात्र शेतकर्यांना उणे अनुदान दिले जाते, हे सप्रमाण सिद्ध केले.
शरद जोशी यांची ग्रंथसंपदा
१ शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती
२ प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश
३ चांदवडची शिदोरी - स्त्रियांचा प्रश्न
४ शेतकर्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख
५ स्वातंत्र्य का नासले?
६ खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने
७ अंगारमळा
८ जग बदलणारी पुस्तके
९ अन्वयार्थ - १,२
१० माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो
११ बळीचे राज्य येणार आहे
१२ अर्थ तो सांगतो पुन्हा
१३ पोशिंद्याची लोकशाही
१४ भारतासाठी
१५ राष्ट्रीय कृषिनीती
इंग्रजी ग्रंथसंपदा
1 Answering before God
2 The Women's Question
3 Bharat Eye view
4 Bharat Speaks Out
5 Down To Earth
हिंदी ग्रंथसंपदा
१ समस्याए भारत की
२ स्वतंत्रता क्यों नाकाम हो गई?
