नाते भावा बहिणीचे
| सर्व आटापिटा झाल्यावर मग तो भाग्याचा दिवस उजाडतो. सकाळीच उठून झरझर सर्व कामे आटोपली जातात. बहिण सडा, रांगोळी घालते. आई गोड-धोड करते. संपूर्ण वातावरण प्रसन्नता व उत्साहाने भारलेले असते. श्रावणातल्या निर्सगाच्या किमयेने नटलेल्या, सृष्टीचे चैतन्य ओसंडून वाहणार्या महिन्यात बहीण-भावांचा हा पवित्र सण येतो. या दोघांच्या नात्यातील गहिवर या दिवशी खऱ्या अर्थाने व्यक्त होतो. वास्तविक लहानाचे मोठे होईपर्यंत भांडण, खोड्या, खेळणं, बागडणं, शाळा, अभ्यास सर्व एकत्रच होत होते. हे सगळे शब्दातीत असते. या दिवशी मात्र हे व्यक्त केले जाते. मात्र तेही आगळ्या पद्धतीने. सकाळी सकाळी चंदनाच्या साबणाने आंघोळ करून भावाला रांगोळी घातलेल्या पाटावर बसवले जाते. बहिण त्याला ओवाळते. आपल्या हाताने रेशमी सुताचा धागा असलेली राखी त्याला बांधते. या मांगल्याच्या क्षणी मनात उत्पन्न होणारे भाव फक्त बहिण- भाऊच जाणू शकतात. भाऊ आपण आणलेली भेट बहिणीस देतो. बहिण-भावाचे नातेच तसे आहे विश्वास, आदर, त्यागाच्या पायावर उभे असलेले. बहिण ओवाळते त्यावेळी दोघांमध्येही मूक संवाद सुरू असतो. बहिण म्हणत असते, माझ्या भावा मी तुझ्यावर किती माया करते. बहीण भावास यश़, कीर्ती चिंतित असते. माझा भाऊ कर्तृत्ववान व सामर्थ्यवान व्हावा अशीच तिची मनोमन इच्छा असते. तर भाऊ म्हणत असतो, तू काळजी करू नको. अडचण व संकटसमयी धावून येणार तोच खरा भाऊ! तुझा भाऊसुद्धा अशा प्रसंगी नक्की धावून येईल. बहीण- भाऊ दूर असले तर बहिण फोन करून
|

