1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

BPCL ला 158 कोटीचा फटका

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएलला चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत 158.77 कोटीचा फटका बसला असून, मागील वर्षात कंपनीला 2625.27 कोटीचा तोटा झाला होता.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत कंपनीच्या उत्पन्नातही घसरण झाली आहे. चालू वर्षात कंपनीचे उत्पन्न 27513.40 कोटी होते. मागील वर्षात कंपनीने 38148.73 कोटीची कमाई केली होती.