1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

पडझडीनंतर बाजार सावरला

दुपारच्या सत्रापर्यंत दणक्यात घसरणाऱ्या मुंबई शेअर बाजारात आज अचानक तेजी दिसून आली. बीएसईचा निर्देशांक 236 अंशांच्या वाढीसह 17,022 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीत 63 अंशांची वाढ झाल्याने निफ्टी 5,052 अंशांवर बंद झाला.

आज बाजार सुरू झाल्यानंतर बाजारात सातत्याने घसरण होत होती. दुपारच्या सत्रानंतर मात्र बाजारातील चित्रच पालटले. बाजारात अचानक तेजी निर्माण झाली.

बीएसईच्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही क्रमशः: 1.08 आणि 0.43 अंशांची वाढ दिसून आली. एसीसी, हिंडाल्को, जयप्रकाश असोसिएटस, महिंद्रा एंण्ड महिंद्रा, टाटा स्टील या कंपन्यांचे शेअर्स आज बाजारात वधारले होते.तर दुसरीकडे भेल, रिलायन्स इंफ्रा, मारुती सुझुकी, या शेअर्समध्ये पडझड दिसून आली.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा