1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

बाजार 17 हजारांखाली बंद

बाजार 17 हजारांखाली बंद
घसरतच सुरू झालेल्या मुंबई शेअर बाजारात अखेरीस मोठी पडझड झाल्याने बाजार 16,855 अंशांवर बंद झाला. बीएसईच्या निर्देशांकात 344 अंशांची तर निफ्टीत 103 अंशांखाली बंद झाला.

बाजारात रॅनबॅक्सी, सन फार्मा, या शेअर्सचे मोठे नुकसान झाले तर टाटा स्टील, सेल, आणि पीएनबीमध्ये जोरदार खरेदी दिसून आली.

सुरुवातीपासूनच बाजारावर विक्रीचा दबाव स्पष्ट दिसून येत होता. सकाळी बाजारात घसरण झाल्यानंतर दुपारच्या सत्रात बाजार स्थिरावेल असे वाटत होते. मात्र दुपारीही बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली. बीएसई घसरत 16,855 अंशांवर तर निफ्टी 5006अंशांवर बंद झाला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा