1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

भारताची 200 टन सोने खरेदी

भारताने दिवाळीच्‍या काळात आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून (आयएमएफ) 6.7 अब्‍ज डॉलर किंमतीचे 200 टन सोने खरेदी केले असल्‍याची माहिती नाणे निधीच्‍या अधिका-यांनी दिली आहे. या खरेदीमुळे आयएमएफचे सोने विक्रीचे उद्दीष्‍ट पूर्ण झाले आहे.

आयएमएफने याबाबत दिलेल्‍या माहितीनुसार भारतीय रिजर्व बँकेने 19 ते 30 ऑक्‍टोबर या 20 दिवसांत 200 टन सोने खरेदी केले आहे. आयएमएफच्‍या संचालक मंडळाने आपल्‍या सुवर्ण खजिन्‍यातील 403.3 टन सोने विक्रीची परवानगी दिली होती. त्‍यानंतर भारतानेच त्याचा अर्धाभाग खरेदी केला आहे.