1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

शेअर बाजारात 268 अंशांची पडझड

आठवड्याच्या पहिल्या दिवशीच बाजारात विक्रीचा दबाव निर्माण झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज 268.14 आणि राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 80.20 अंशांनी घसरत बंद झाले.

मागील आठवड्यात बीएसईने 17 हजारांचा तर निफ्टीने 5 हजारांचा पल्ला गाठला होता. बाजार आज 1.56 टक्क्यांनी घसरत 16,866.41 अंशांवर बंद झाला.

राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीत 1.58 टक्क्यांची घसरण झाल्याने बाजार 5,003.20 अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही पडझड दिसून आली.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा