1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

शेअर बाजारात चढ-उतार

मुंबई शेअर बाजारात आज सुरुवात जरी सकारात्मक झाली असली तरी, बाजाराचा शेवट मात्र फ्लॅट झाला. राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 8 अंशांनी वधारत 5,131 अंशांवर बंद झाला तर बीएसईमध्ये 16 अंशांची किरकोळ वाढ झाल्याने बाजार 17,186 अंशांवर बंद झाला.

बाजाराच्या सुरुवातीलाच बाजारात पुन्हा एकदा तेजी निर्माण होईल असे संकेत मिळत होते, परंतु दुसर्‍या आणि अखेरच्या सत्रात मात्र बाजारात घसरण झाल्याने बाजार किरकोळ वधारत बंद झाला.

आयसीआयसीआय बँक आणि यूनिलिव्हरच्या शेअर्समध्ये घसरण झाली तर, रॅनबॅक्सी, सीप्ला, रिलायन्स पावरमध्ये वाढ दिसून आली.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा