1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

शेअर बाजारात पडझड सुरूच

रिझर्व्ह बँकेने पतधोरणात कोणतेही बदल न करण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवार पासून मुंबई शेअर बाजारात सुरू असलेली पडझड आजही कायम होती. आज बीएसईच्या निर्देशांकात 69 अंशांची तर राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीत 20 अंशांची घसरण झाली.

रियल्टी, तेल, गॅस, सीजी, आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी झाल्याने बाजाराच्या पडझडीला ब्रेक लागला. परंतु बाजार बंद होईपर्यंत विक्रीचा दबाव बाजारावर दिसून आला.

बीएसईमध्ये 69 अंशांची घसरण झाल्याने बाजार 16283.49 अंशांवर बंद झाला. तर निफ्टीत 20 अंशांची घसरण झाल्याने बाजार 4826.15 अंशांवर बंद झाला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा