पुरूषप्रधान संस्कृती
|
आपले आई-बाबा, भाऊ-वहिनी यांच्यातही असेच प्रेम असते तर... असा विचार दोघींच्या मनात यायचा. दोघींना काकांच्या या रोमॅंटिक स्वभावाचे कोडे पडायचे. काकूंच्या शांत स्वभावाचेही त्यांना आश्चर्य वाटायचे.
म्हणूनच एके दिवशी काकांचे मोठमोठ्याने ओरडणे ऐकून त्या अवाकच झाल्या. 'या अशा जळालेल्या पोळ्या खाण्यासाठी मी लग्न केलेले नाही. जर तुला काम येत नाही हे जर मला माहित असते तर मी तुझ्याशी लग्न केले नसते ', असे गुप्ते काका काकूंना मोठमोठ्याने सुनावत होते. दोघी काकांचे रौद्ररूप पहिल्यांदाच पाहत होत्या. काकू कालपासून आजारी असल्याचे दोघींना लक्षात आले. त्यात कामवाली बाई आज येणार नव्हती. काकूंनी कठीण परिस्थितीतही स्वयंपाक केला होता. पण हे न लक्षात घेता काका त्यांच्यावर ओरडत होते. गुप्ते काकांच्या रोमॅंटिक बुरख्याखाली एक पुरूष लपल्याचे त्या दोघींना अखेर लक्षात आले. या प्रसंगाने काकांचे खरे रूप समोर आले. पुरूषप्रधान संस्कृतीत किती तरी घरात अशा प्रकारे स्त्रियांवर अत्याचार होत असतील, या विचारात अनिता व कल्पना हरवून गेल्या.
