1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. A necklace worth 7 tolas was stolen at the wedding!

लग्नात 7 तोळ्यांचा हार गेेला चोरीला!

काटोल इथली एक महिला नागपुरातील बहादूरा इथं एका लॉनमध्ये लग्न सोहळ्यात सहभागी झाली होती. लग्न सोहळा धूमधडाक्यात पार पडल्यानंतर वधू पक्षातील सर्व नातेवाईक थोडे विसावले होते. त्याचवेळी या महिलेला आपला सात तोळ्यांचा सोन्याचा हार चोरीला गेल्याचं लक्षात आले पण पोलिसांच्या युक्तीमुळे चोरीला गेलेला सात तोळ्यांचा हार त्या  महिलेला परत मिळू शकला.
 
या महिलेने तिथे उपस्थित नातेवाईकांना विचारपूस केली. पण हारबद्दल काहीच माहिती नसल्याचं तिला उत्तर मिळालं. तिथे उपस्थित सगळ्या नातेवाईकांना एकत्र गोळा केलं आणि सांगितले की आम्ही चोराला अर्धा तासात हुडकून काढू. त्यामुळे ज्यांनी कोणी हार चोरी केला असेल त्यांनी खोलीत गादीखाली तो हार ठेवून बाहेर पडावं असं केल्यास कोणावरी गुन्हा दाखल होणार नाही असं आवाहन केलं.
 
त्यानुसार एक नातेवाईक खोलीत गेले सर्व नातेवाईक खोलीतून बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी खोलीची तपासणी केली आणि पोलिसांना चोरी गेलेला हार गांदीच्या खाली सापडला. अशा प्रकारे नातेवाईकांना न दुखवता त्या महिलेला चोरी गेलेला सोन्याचा हार पोलिसांनी मिळवून दिला.  
पुढील लेख
अमृतसरच्या गुरु नानक देव रुग्णालयात भीषण आग लागली