फडणवीस - ठाकरे भेट ठरवेल युती
राज्यातील सर्वात मोठी आणि सध्या सर्व पक्षा करिता महत्वाची असलेली , मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीसंदर्भात चर्चा झाली आहे . यावेळी भाजपा चे विनोद तावडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत युती संदर्भात प्राथमिक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.
महापालिकेमध्ये पारदर्शी कारभार झाला पाहिजे हा मुद्दा भाजपनं लावून धरला आहे . याबाबत आम्ही भूमिका घेऊ शकत नाही, वरिष्ठांबरोबर चर्चा करावी लागेल अशी भूमिका शिवसेनेनं घेतली. तर हि भेट केवळ औपचारिकता ठरली असून , मुख्य निर्णय आता मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे घेणार असून त्यातही ते काही मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती अनिल देसाईंनी दिली.
