1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. christmas

ख्रिसमसच्या आनंदासोबत किडपॉपकडून आपल्या प्री स्कूलचे उदघाटन

किडपॉप हे मानपाडा येथे स्थित बाल शिक्षण केंद्र असून ते ठाण्याच्या केंद्रस्थानी आहे आणि त्यांनी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला आपल्या प्री स्कूलचे अनावरण केले. या अनावरणासोबत मुलांसाठी ख्रिसमसच्या पार्टीचे आयोजन केले होते. त्यात मुलांनी आपल्या आवडत्या गाण्यांवर मनसोक्त नृत्य केले. या शाळेने अत्यंत कलात्मकरित्या एक धमाल डिजेम्बे उपक्रमाचे आयोजन केले होते जिथे मुलांना नाटक सादर करून गोष्टीं शिकता आल्या.
 
बालसंगोपन शिक्षण समुपदेशक, प्री स्कूल समुपदेशक आणि पूर्वप्राथमिक अभ्यासक्रम विकासक म्हणून काम करणाऱ्या श्री. ब्रुंदा कथरानी यांनी किडपॉपची स्थापना केली आहे. किडपॉप १० महिने ते २ वर्षे वयोगटातील मुलांच्या गरजा पूर्ण करते. त्यांची मोहीम तरूण मनांना मोठे होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला कारणीभूत ठरणाऱ्या योग्य वातावरणात शिकण्यास मदत करण्याची आहे. यातील प्राथमिक लक्ष्य हे मुलांना बालस्नेही अभ्यासक्रम प्रदान करणे जो वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम, प्रमाणपत्र धारक प्रशिक्षक, कलात्मक अभ्यास योजनांद्वारे शिकवला जाईल. त्यात एक जैविक बगीचा, किंडरगार्टन, किडपॉप स्टुडिओ, सँड प्ले यांचाही समावेश आहे.
 
किडपॉपचा विश्वास आहे की, आजच्या मुलांच्या विकासाच्या अत्यंत टोकाच्या गरजा लक्षात घेऊन पालकांनी आपल्या मुलांच्या गरजांची पूर्तता कशी करायची हे जाणून घेतले पाहिजे. हीच गोष्ट लक्षात ठेवून किडपॉपने लॅटिन, बेली डान्स, झुम्बा डान्स क्लासेस, फ्रेंच भाषा आणि प्रौढांसाठी अनेक उपक्रम विकसित केले आहेत आणि त्यातून त्यांनी पुढील पिढ्यांच्या सर्वांगीण विकासाची बिजे रोवली आहेत.