1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Donald Trump

जर्मनीत लक्षावधी स्थलांतरित ही घोडचूक: ट्रम्प

न्यूयॉर्क- जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी जर्मनीत 10 लाखांहून अधिक निर्वासितांना प्रवेश देऊन घोडचूक केल्याचे परखड मत अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. ट्रम्प यांनी ब्रिटीश व जर्मन वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना‍ दिलेल्या मुलाखतीमध्ये परराष्ट्र धोरणासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली.
 
अमेरिकेसाठी फायदेशीर व्यापार करार व सीमरेषांची सुरक्षा, हे प्राधन्यक्रमावरील विषय असल्याचे ट्रम्प यांनी यावेळी स्पष्ट केले. अमेरिकेची इतर देशांबरोबर असलेली वित्तीय तूट भरून काढणे अत्यावश्यक असल्याचे ‍प्रतिपादन ट्रम्प यांनी केले.
पुढील लेख
फेसबुक, व्हॉट्स अॅपला सुप्रीम कोर्टाची नोटिस