1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. mumbai

मुंबईत भांडूपमध्ये ११ दुचाकी आणि २ चारचाकी जाळल्या

mumbai
मुंबईतील भांडूपध्ये श्रीरामपाडा परिसरात काल मध्यरात्री तब्बल 13 वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 
अज्ञातांनी तब्बल 11 दुचाकी, 2 चारचाकी वाहनांची जाळपोळ करण्यात आली. वैयक्तिक वादातून ही जाळपोळ करण्यात आली असावी असा अंदाज सध्या व्यक्त करण्यात येतो आहे.
 
या प्रकारानंतर वाहन मालकांनी पोलिसात धाव घेतली आहे. सध्या पोलीस याप्रकरणी कसून तपास करत आहे. मात्र, अद्यापही आरोपींबाबत कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.