1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. ramdas athavale

रामदास आठवले यांच्या ताफ्याला अपघात

ramdas athavale

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्याला पुणे येथे हायवेवर अपघात झाला.  मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. पुण्यात किवळेफाटा हायवे येथे रस्त्याच्या मधोमध एक तवेरा गाडी उभीर होती. सुरुवातीला रस्त्यात गाडी उभे असल्याचे आठवले यांच्या गाडीच्या चालकाला दिसले नाही. मात्र ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीनं स्वतःची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी आठवले यांच्या वाहनामागे असलेल्या पोलीस वाहनाची त्यांच्या गाडीला जोरदार धडक बसली. यात रामदास आठवले यांच्या वाहनाचे नुकसान झाले मात्र सुदैवानं कुणीही जखमी झालेले नाही. रामदास आठवलेदेखील सुखरूप आहेत. 

पुढील लेख
प्रेग्नेंट सेरेना विलियम्स ने करवले न्यूड फोटोशूट, दाखवले बेबी बंप