1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. siddhi vinayak

सिद्धिविनायक मंदिरात अडीच किलो सोन्याचा लिलाव

siddhi vinayak

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर  सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी अर्पण केलेल्या जवळपास अडीच किलो सोन्याचा लिलाव करण्यात आला. यात 323 प्रकारच्या दागिन्यांचा लिलाव झाला. यात चेन, हार, अंगठी, ब्रेसलेट, सोन्याची बिस्किटे आदींचा समावेश आहे. या लिलावात जयेश पाठक या गणेशभक्ताने 1 लाख 55 हजारांची सर्वाधिक बोली लावून लिलावातील सोन्याची नाण्यांची खरेदी केली. जयेश गेल्या 27 वर्षांपासून रोज सिद्धीविनायकाच्या दर्शनाला येतात. 2009 पासून ते या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेऊन काही ना काही खरेदी करतात. 

पुढील लेख
सुंदर पिचाई : सर्वाधिक पगार घेणारी जगातील एकमेव व्यक्ती