संबंधित माहिती
- कलिंगड नाही तर उंदीर मारण्याचे विष खाल्याने मृत्यू; मुंबईतील पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा मोठा खुलासा
- LIVE: प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता नाही ठामपणे नाकारली
- नाहीतर, बुलेट ट्रेन आतापर्यंत धावायला सुरुवात झाली असती... विलंबाला ठाकरे जबाबदार! म्हणाले-रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
- मनसेच्या विरोधानंतर शासकीय अधिकाऱ्यांसाठी होणारी हिंदी भाषेची परीक्षा रद्द करण्यात आली
- बारामतीमध्ये विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला
राज्य शासनाने सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू केली; सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणार पगाराच्या 50 % पेन्शन
महाराष्ट्र सरकारने नुकताच याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. NPS अंतर्गत येणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे. यात शेवटच्या पगाराच्या ५०% पेन्शन + महागाई भत्त्याची तरतूद आहे.
२० वर्षे किंवा अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या ५०% पेन्शन + महागाई वाढ (DA) मिळेल. ही योजना ऐच्छिक आहे. इच्छुक कर्मचाऱ्यांनी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत विभागप्रमुखांकडे लेखी पर्याय सादर करावा लागेल. जे पर्याय घेतील त्यांनाच ही योजना लागू होईल.
निवृत्तीवेळी NPS मधील ६०% संचित निधी सरकारकडे जमा करावा लागेल . ४०% वर वार्षिकी घ्यावी लागेल आणि त्यानुसार पेन्शन समायोजित होईल. जिल्हा परिषद, अनुदानित शैक्षणिक संस्था, विद्यापीठे इ. कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहे. तर राजीनामा दिलेल्यांना लागू नाही.
ही योजना केंद्र सरकारच्या Unified Pension Scheme (UPS) सारखीच आहे आणि कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळाच्या मागणीला यश आले आहे. मार्च २०२४ पासून योजना जाहीर होती, पण आता पूर्ण कार्यपद्धती आणि GR निघाल्याने अंमलबजावणी सुरू होईल.
Edited by-Dhanashri Naik
