बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 जून 2020 (14:30 IST)

स्वाभिमानीच्या नेत्यांची अखेर गळाभेट, ‘आम्ही सर्व एक आहोत’: शेट्टी

राज्यपाल कोट्यातील विधानपरिषद सदस्य निवडीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील अंतर्गत वादळ अखेर शुक्रवारी रात्री उशिरा मिटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन गळाभेट घेतली आहे. स्वाभिमानीचे साखरपेरणीचे राजकारण यशस्वी झाले असून शेट्टी (raju shetti)यांनी दावा केला प्रकरण प्रमाणे हे पेल्यातील वादळ ठरले. ‘आम्ही सर्व एक आहोत’असा जयघोष करीत स्वाभिमानीचे नेते एकत्र आले असून सर्वांनी मिळून छायाचित्र काढले आहे.
 
यामुळे शेट्टी यांचा विधानपरिषदेचा मार्ग अधिक प्रशस्त होताना दिसत आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रात्री उशिरा एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे त्यामध्ये प्रमुख नेत्यांचा समावेश आहे त्यांनी या पत्रात पत्रकात म्हटले आहे की, आज दिनांक आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परिवारातील ज्येष्ठ नेते आज एकत्र जमलो.