मराठी चित्रपट दाखवा- आर आर
मल्टिप्लेक्स वाल्यांना मराठी चित्रपट दाखवा नाही तर मल्टिप्लेक्सला टाळे ठोकू असा जळजळीत इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिला.
ते म्हणाले की, मल्टिप्लेक्सबाबत धोरण ठरवताना चुका झाल्याने मालक लोक याचा गैर फायदा घेत आहेत. पाटील यांनी काल (शनिवारी) पंचाहत्तर नामवंत मराठी कलावंतांद्वारे गायलेल्या राष्ट्रगिताच्या चित्रफितीचे प्रकाशन केले.
हे राष्ट्रगीत राज्यातील प्रत्येक चित्रपट गृहात प्रत्येक खेळाच्या वेळी दाखवण्याची सूचना करण्यात येईन, असेही पाटील म्हणाले. गेल्या वर्षी प्रादेशिक भाषांमध्ये तमिळ खालोखाल सर्वाधिक मराठी चित्रपटांची निर्मिती झाली. तरी देखिल मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्थान नाही ही खेदाची बाब आहे, असेही ते म्हणाले.
यात राज्य सरकारच्या धोरणाचीही चूक आहे, मराठी चित्रपट दाखविले गेले पाहिजे मल्टिप्लेक्सवाल्यांना हा सक्तीचा नियम आहे. नियम हे पायदळी तुडविण्यासाठी नसतात तर ते पाळण्यासाठी असतात, हे सांगण्याची वेळ आता आली असल्याचेही ते म्हणाले.