1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर

लिटील मास्टरचा आज वाढदिवस

लिटील मास्टरचा आज वाढदिवस
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज (दि.24) वाढदिवस असून तो ३७ व्या वर्षात पदार्पण करतोय. सध्या आयपीएल मालिकेमुळे दक्षिण आफ्रिकेत असल्याने आपल्या लाडक्या सच‍िनच्या वाढदिवसानिमित्त सहकार्‍यानी सरप्राईज पार्टीचे आयोजन करून त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या.

वयाच्या सोळाव्या वर्षी सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर पदार्पण केले. १५९ कसोटी खेळून १२ हजार ७७३ धावा केल्या तर ४२५ एकदिवसीय सामन्यात १६ हजार ६८४ धावा फटकारल्या. याशिवाय अनेक विक्रम सचिनने आपल्या नावावर केले आहेत.सचिनची धावांची आणि विक्रमांची भूक अजूनही संपलेली नाही.

सध्या सचिन दक्षिण अफ्रिकेत सुरू असलेल्या आयपीएलच्या माकिलेत मुंबई इंडियन्सचे नेतृत्त्व करत आहे. मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात सचिनने फटकावलेल्या अर्धशतकामुळे संघाला विजय मिळवता आला. मॅन ऑफ दी मॅचही तोच ठरला. क्रिकेट पदार्पणाच्या जवळपास १९-२० वर्षांनंतरही सचिनच्या कामगिरीतील हे सातत्य पाहून या सम हा हेच म्हणावे लागेल नाही काय?
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा