1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर

सचिन उचलणार 200 मुलांचा शिक्षणाचा खर्च

भारताचा विक्रमदित्य सचिन तेंडुलकर आणि त्याच्या सामजिक बांधिलकची चर्चा नेहमी होत असतो. क्रिकेटमधील सर्वोच्च शिखरावर पोहचूनही त्याच्या विनम्रतेमुळे त्याचा वेगळाचा 'फॅन' क्लब निर्माण झाला आहे. सदैव दुसर्‍याचाही विचार करणारा सचिनने आता 200 मुलांच्या शिक्षणचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

सचिन एका स्वयंसेवी संस्थेमार्फत 200 मुलांचा शिक्षणासाठी खर्च करणार आहे. तो म्हणाला,' सामजिक बांधिलकीसाठी माझे प्रेरणास्त्रोत वडीलच राहिले आहे. प्राध्यापक असलेले माझे बाबा वृत्तपत्र वाटणार्‍या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलत होते. आमच्या घरी पोस्टमन, सुरक्षा रक्षकही चहा घेतल्याशिवाय जात नव्हता. या घटनांनी मला दुसर्‍यांची चिंता करण्याची शिक्षण मिळाले. माझ्या वडीलांच्या पावलापाऊल टाकून 200 मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय मी घेतला आहे. त्यासाठी चॅरीटीचा खर्च मी दुप्पट करणार आहे.'