1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By भाषा|

स्वयंपाकघरातही सचिनचा षटकार

स्वयंपाकघरातही सचिनचे षटकार
क्रिकेटच्या मैदानावर चौकार, षटकार ठोकणारा सचिन स्वयंपाकघरातही षटकार ठोकू शकतो. होय, सचिनला चांगल्या फलंदाजीप्रमाणे चांगला स्वयंपाकही करता येतो. वेगवेगळे खाद्यपदर्थ बनविण्यात सचिन तरबेज असून समुद्री भोजन त्याला खूप आवडते, ही माहिती सचिनने आयबीएन-7ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

सचिन हिंदीतील जुन्या गाण्यांचा रसिक आहे. त्याप्रमाणे तो इंग्रजी गाणेही ऐकतो. गाण्यांच्या या आवडीमुळे तो आपल्याजवळ नेहमी आयपॅड ठेवतो. क्रिकेट मैदानावरील आपल्या कामगिरीने तो कधीही समाधानी नसतो. यामुळे अधिक चांगली कमगिरी करण्याची आपणास प्रेरणा मिळत असल्याचे तो सां‍गतो. सचिनने सन 2004 मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 241 धावांची मॅरेथॉन खेळी केली होती. ही खेळी करण्यापूर्वी त्या सामन्यात कव्हर ड्राईव न मारण्याची शपथ त्याने घेतली होती आणि ती पूर्णही केली.