संबंधित माहिती
- MI vs KKR:आज मुंबई हरली तर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल,प्लेइंग-11 जाणून घ्या
- RR vs SRH : हैदराबादने शेवटच्या चेंडूवर राजस्थानचा एका धावेने पराभव करून विजय मिळवला
- IPL 2024: मुंबईचा कर्णधार हार्दिकला आणखी एक मोठा धक्का, 24 लाखांचा दंड ठोठावला
- PBKS vs CSK : चेन्नईचा वेग कायम ठेवण्याचे लक्ष्य असेल तर पंजाब प्लेऑफ मध्ये राहण्यासाठी प्रयत्न करेल
- बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला
MI vs KKR : कोलकाताने मुंबईचा 24 धावांनी पराभव केला
IPL 2024 चा 51 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता संघ 19.5 षटकात 169 धावांवर ऑलआऊट झाला. कोलकाता कडून पुन्हा मुंबईचा 24 धावांनी पराभव झाला .
कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 24 धावांनी पराभव केला. मुंबईच्या या पराभवामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. त्याचबरोबर केकेआरच्या खात्यात 14 गुण आहेत. श्रेयस अय्यरचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून प्लेऑफसाठी पात्र होण्याच्या मार्गावर आहे. मुंबई -0.356 नेट रन रेटसह नवव्या स्थानावर आहे.
170 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करण्यासाठी मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. MI ने पॉवरप्ले मध्ये तीन गडी गमावले. सूर्यकुमार यादवने स्फोटक कामगिरी केली. त्याने 35 चेंडूत 56 धावा केल्या. 360 डिग्री फलंदाजाने 30 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे 24 वे अर्धशतक आहे
मुंबईचा संपूर्ण संघ 18.5 षटकांत 145 धावा करून बाद झाला
मिचेल स्टार्कने 19व्या षटकात तीन बळी घेतले. त्याने टीम डेव्हिड, पियुष चावला आणि जेराल्ड कोएत्झी यांना बाद केले. या सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या. तर वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
Edited By- Priya Dixit
