testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दम आलू (काश्मिरी)

dam aloo
साहित्य :- बारीक म्हणजे छोटे बटाटे १०/१२, अर्धी वाटी चिरलेली सफरचंद (सफरचंद चिरल्यावर त्याला लिंबाचा रस चोळावा म्हणजे काळे पडत नाही), अर्धी वाटी अननसाचे तुकडे, अर्धी वाटी द्राक्षे, काजू ५-६, मीठ स्वादानुसार, तिखट अर्धा चमचा, हिरवी मिरची ठेचा पाव चमचा,चार टीस्पून तूप, एक चमचा गरममसाला, दुध.

ग्रेव्ही साहित्य :- एक चिरलेला टोमॅटो, पाच भिजवलेले काजू, एक डावभर ओले खोबरे, दोन-तीन चमचे भिजवलेले खसखस, पाव चमचा आलेकिस.

कृती :- बटाटे प्रथम उकडून घ्यावेत. नंतर सोलून थोडे तूप टाकून लालसर परतून घ्यावेत. थोडी हळद, तिखट, मीठ, मिरचीचा ठेचा, गरम मसाला सर्व घालावे. एक चिरलेला टोमॅटो, ५ भिजवलेले काजू, १ डावभर ओले खोबरे, २-३ चमचे भिजवलेले खसखस, पाव चमचा आलेकिस हे सर्व मिक्सरमधून काढावे. ही झाली ग्रेव्ही. थोडी ग्रेव्ही बटाट्यावर घालून परतावी. राहिलेल्या ग्रेव्हीमध्ये दुध घालावे. नंतर त्यात वरील सर्व फळे घालून बटाट्यांना टोचे मारावेत. गरमागरम काश्मिरी दम आलू रोटीबरोबर खायला द्यावेत.


यावर अधिक वाचा :