1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. भाजप राष्ट्रीय अधिवेशन

भाजप राम मंदिरासोबत मशिदही बांधणार!

राम मंदिराचा राग भाजपने आज पुन्हा आळवला. अध्यक्ष नितिन गडकरी यांनी राम मंदिर बांधण्यासाठी आग्रही रहाण्याची भाजपच्या अध्यक्षांची परंपरा आजही पाळली. पण काहीशा सौम्यपणे.

राम हा आमचा वारसा असून त्याच्या मंदिराचे अस्तित्व वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आता सिद्ध झाले आहे. असे असताना आता मुस्लिम समाजाने सामंजस्याची भूमिका घेऊन तेथे हिंदूंना मंदिर बांधू द्यावे. त्याच्या शेजारी मशीद बांधण्यासाठी आम्ही सहकार्य करू असेही त्यांनी सांगितले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा