6 कोटींची अंगठी देऊन असीनला केलं प्रपोज?
बॉलीवूड अभिनेत्री असीनला तिचा प्रियकर राहुल शर्मानं जवळपास 6 कोटींची अंगठी गिफ्ट केल्याची बातमी आहे. बिझनेसमॅन राहुल शर्मानं जवळपास एका वर्षापूर्वी असीनला बॉलीवूड स्टाइलमध्ये प्रपोज केलं आणि गिफ्ट दिलं. वेबसाइटचं म्हणणं आहे की, ही अंगठी खास करून असीनसाठी राहुलनं बेल्जियमहून इंपोर्ट केली होती. राहुलनं असीनला 20 कॅरेटचं सॉलिटेयर गिफ्ट केलं. याची किंमत सहा कोटी रुपये आहे.
रिपोर्टनुसार लवकरच हे जोडपं विवाहबंधनात अडकणार आहे. बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमारने असीन आणि राहुलची भेट घडवली होती. यानंतर हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लवकरच ते लग्न करणार आहेत.
