शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जुलै 2020 (14:44 IST)

कंगना- स्वरामध्ये वादाची ठिणगी; आरोप प्रत्यारोपांचा भडका

अभिनेत्री कंगना राणौत ही गेल्या काही वर्षांपासून तिच्या चित्रपटातील भूमिकांपेक्षा काही वादग्रस्त वक्तव्यांमळं चर्चेत आहे. कंगना आणि तिच्याभोवती असणारं वादाचं वलय ही काही नवी बाब नाही. त्यातच आता भर पडली आहे ती म्हणजे आणखी एका विषयाची. 
 
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनानं पॅरेलल सिनेमा या मुद्द्याला हात घातला होता. किंबहुना या संकल्पनेची सुरुवात कलाविश्वात आपण केल्याचा दावाच तिनं केला होता. ज्यावर अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं तिची प्रतिक्रिया देत बी टाऊनच्या या क्वीनवर निशाणा साधला.
 
स्वरानं ट्विट करत लिहिलं, ''१९५५ मध्ये 'पाथेर पांचाली' या चित्रपटासोबतच कंगना यांनी पॅरेलल सिनेमाची सुरुवात केली. २०१३ मध्ये त्यांनी 'क्वीन' पासून स्त्रीवादाची सुरुवात केली. पण, या साऱ्याच्याही आधी त्यांनी १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं''. 
 
इतक्यावरच न तांबता स्वरानं, कहत एक अज्ञात चापलूस ज़रूरतमंद आउट्साइडर, चापलूसी का फल (आम) खाते और उँगलियाँ चाटते हुए।  अशी ओळ लिहित कंगनावर टीका केली.