मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 जुलै 2020 (11:28 IST)

पुन्हा एकदा 'धीरे धीरे से मेरी जिंदगी मैं आना'

अल्फोज पुथरिन दिग्दर्शक 'प्रेमम' या सिनेमाने सगळ्याच प्रेक्षकांवर जादू केली. या सिनेमातील 'मलार' म्हणजे अभिनेत्री सई पल्लवीची जादू आजही कायम आहे. सई पल्लवीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
यात पुन्हा एक सई आणि तिच्या प्रेमाची गोष्ट  पाहायला मिळणार आहे. या व्हिडिओत सई आणि अभिनेता शारवानंद यांची एक सुंदर प्रेम कहाणी या गाण्यात पाहायला मिळणार आहे.
 
'आशिकी' सिनेमातील 'धीरे धीरे से मेरी जिंदगी मैं आना' या सिनेमातील गाणं पुन्हा एकदा रिक्रिएट केलं आहे. मलर आणि शारवानंद या दोघांची एक सुंदर लव्हस्टोरी या गाण्यात पाहायला मिळते. सई ही एक डॉक्टर आहे आणि या गाण्यात ती डॉक्टरची भूमिका साकारत आहे.