मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 जुलै 2020 (15:59 IST)

चीनने लडाखची जमीन बळाकवली, भारत-चीन तणावावरून राहुल गांधींकडून व्हिडिओ शेअर

नवी दिल्ली – भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत लडाखचे काही नागरिक चिनी लष्कराच्या घुसखोरीविरोधात बोलत आहेत आणि चिनी लष्कराच्या हालचाली दाखवणारी काही छायाचित्रेही दाखवण्यात आली आहेत.

राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, लडाखचे लोक चीनच्या घुसखोरीविरोधात आवाज उठवत आहेत. ते ओरडून-ओरडून सावध करत आहेत. त्यांच्या या इशाऱ्याकडे डोळेझाक करणे महागात पडू शकते. भारतासाठी कृपा करून त्यांचे म्हणणे ऐकावे. राहुल गांधी यांनी शेयर केलेल्या व्हिडिओत चीनने आमची जमीन घेतल्याचे लडाखचे लोक सांगताना दिसत आहेत. चिनी सैनिक गलवान खोऱ्यात १५ किलोमीटर आत आल्याचे एक नागरिक या व्हिडिओत सांगत आहे.