मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 जुलै 2020 (09:16 IST)

धक्कादायक ऑफर! 2500 रुपयात मिळवा करोना निगेटिव्ह रिपोर्ट

करोना व्हायरसने जगभरात थैमान मांडला आहे, देशभरात चिंतेचं वातावरण असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका खासगी रुग्णालयाने 2500 रुपयात करोना निगेटिव्ह रिपोर्ट देण्याची ऑफर देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. 
 
या व्हिडीओत रुग्णालयाकडून सांगितलं जात आहे की, 2500 रुपयात करोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देण्यात येईल ज्यावर एका सरकारी रुग्णालयाचा शिक्का असेल. हा रिपोर्ट 14 दिवसांसाठी ग्राह्य असेल. 
 
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाविरोधात एफआयआर दाखल करण्यता आला आहे. यासोबत रुग्णालयाला टाळं ठोकण्यात आलं असून, जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यावर चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. 
 
मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांकडे रुग्णालयाने दिलेल्या निगेटिव्ह रिपोर्टदेखील सादर करण्यात आला असून त्यावर प्यारेलाल जिल्हा रुग्णालयाचा शिक्का आहे. मात्र प्यारेलाल जिल्हा रुग्णालयाद्वारे यासंबंधी कोणतीही माहिती आली नसल्याचं सांगण्यात येत आहे तसेच हा व्हिडीओ खोटा असून रुग्णालयाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. 
 
मेरठमध्ये आतापर्यंत 1116 कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून सध्या 275 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 69 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र या धक्कादायक प्रकारामुळे आता आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.