शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 13 जून 2020 (08:24 IST)

परकीय चलनाने ५०० अब्ज डॉलरचा टप्पा पार केला

भारताकडील परकीय चलनाच्या साठ्याने ५०० अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे. पाच जूनला संपलेल्या आठवड्यामध्ये भारताकडील परकीय चलनाच्या साठ्यात ८.२२ अब्ज डॉलरची भर पडली असून, त्यामुळे देशाकडील एकूण परकीय चलनाच्या साठा ५०१.७० अब्ज डॉलरवर पोहोचला आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. दरम्यान,  देशाच्या परकीय चलनाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे.
 
यापूर्वी २९ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये भारताकडील परकीय चलनाच्या साठ्यात ३.४४ अब्ज डॉलरची भर पडून तो ४९३.४८ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. दरम्यान, परकीय चलनाच्या साठ्यात झालेल्या या वाढीमुळे आता भारत परकीय चलनाच्या साठ्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता केवळ चीन आणि जपानकडे भारतापेक्षा अधिक परकीय चलनाच्या साठा आहे. तर परकीय चलनाच्या साठ्याच्याबाबतीत भारताने रशिया आणि दक्षिण कोरियाला कधीच मागे टाकले आहे.