शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘बाला’ ने ५० कोटीचा आकडा पार केला

आयुषमान खुरानाची मुख्य भूमिका असलेल्या ‘बाला’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने ५० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. ‘अंधाधून’, ‘आर्टिकल १५’, ‘ड्रीम गर्ल’ आणि आता ‘बाला’ असे सलग हिट चित्रपट आयुषमानने दिले आहेत.
 
‘स्त्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक यांनी ‘बाला’चं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाने चार दिवसांत ५२.२१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. शाळकरी वयापासून केस उडवत हिरोप्रमाणेच टेचात वावरलेल्या मुलाचे ऐन तारुण्यात केसगळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते, हा ‘बाला’चा कथाविषय आहे.
 
बाला’ची आतापर्यंतची कमाई-
शुक्रवार- १०.१५ कोटी रुपये
शनिवार- १५.७३ कोटी रुपये
रविवार- १८.०७ कोटी रुपये
सोमवार- ८.२६ कोटी रुपये
एकूण- ५२.२१ कोटी रुपये