1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019 (10:14 IST)

राज यांच्याकडून 'पानिपत' ची प्रशंसा

Praise from Panipat by Raj
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत – द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित होतो आहे. त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट केले आहे.
 
गोवारीकरांच्या चित्रपटाचा ट्रेलर राज ठाकरेंना आवडला असून ट्विट करत त्यांनी ट्रेलरची प्रशंसा केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, “दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या लढाईवरचा ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पाहिला. ट्रेलरच इतका सुंदर आहे की चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार याची खात्री आहे.” या ट्रेलरसोबतच चित्रपटदेखील पाहण्याचे आवाहन राज यांनी या ट्विटद्वारे केले आहे.