सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जून 2020 (15:58 IST)

सावध राहा : नव्या पद्धतीने होत आहे पैसे चोरी, स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना ऑनलाईन बँकिंग बाबत सतर्क केले आहे. बँकेचे म्हणणे आहे की आपले पासवर्ड स्ट्रॉंग ठेवा. कारण सायबर गुन्हेगार नव्या पद्धतीने पैसे चोरत आहे.
 
किंबहुना SBI ने आपल्या ऑनलाईन बँकिंग करणाऱ्या सर्व ग्राहकांना आपला पासवर्ड मजबूत करण्याचा सल्ला देत आहे. जेणे करून त्यांना अश्या घटनांपासून वाचता येईल. विशेष म्हणजे सध्याच्या कालावधीत पैशांशी निगडित सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मध्ये वाढ झाली आहे.
 
बँकांनी ट्विट करून लोकांना सल्ला दिला आहे की असे पासवर्ड बनवू नका ज्यांचा अंदाज लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांची नावे किंवा जन्म तारीख पासून वाचण्याचा सल्ला दिला जातो. या मध्ये सांगितले आहे की Jan@2020, admin@123 सारखे पासवर्ड ठेवू नये.
 
पासवर्डच्या संदर्भात बँकेने म्हटले आहे की अल्फाबेट अपर, लोवर केस बरोबरच संख्या आणि स्पेशल केरेक्टरचा वापर केला गेला पाहिजेत. बँकेने आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की काही काळानंतर इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड बदलत राहावे. 
 
इतकेच नव्हे तर अॅपच्या संदर्भातही बँकांनी म्हटले आहे की ग्राहकांनी फक्त अधिकृत असलेले अॅपच डाउनलोड करायला हवे. कोणत्याही अॅपला परवानगी देताना सावधगिरी बाळगा आणि अॅपमध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्डाची तपशील सेव्ह करू नका.