सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मे 2020 (12:51 IST)

आयकर विभागाची चेतावणी, रीफंड करून देणाऱ्या फेक ईमेल पासून सावध राहा

आयकर विभागाने आयकर करदात्यांना रीफंड करण्याचा दावा करणार्‍या फेक ईमेल पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. 
 
आयकर विभागाने ट्विट करून कर भरणाऱ्यांना सावध केले की रीफंड मिळण्याचे आश्वासन देणार्‍या कुठल्याही लिंक वर क्लिक करू नये. असले कोणतेही संदेश विभागाकडून दिले गेले नाही. 
 
ताजे आकडेवारी सांगते की 8 ते 20 एप्रिलच्या दरम्यान विभागाने वेगवेगळे करदात्यांना 9,000 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे 14 लक्ष रीफंड परतवले आहे. ह्या मध्ये वैयक्तिक हिंदू, एकत्र कुटुंब, प्रोप्रायटर, संस्था, कार्पोरेट, स्टार्टअप, लघु आणि मध्यम उद्योग (SME) वर्गांच्या करदात्यांचा समावेश आहे. 
 
वित्त मंत्रालयाने 8 एप्रिल रोजी कोवीड 19 ने प्रभावित झालेल्या लोकांना आणि कंपनांच्या सवलतीसाठी आयकर विभागाने रीफंड देण्याची प्रक्रिया वेगाने करण्याचे जाहीर केले आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार 5 लक्ष रुपयांपर्यंतचे रीफंड करण्याचे काम वेगाने केली जातील. असे केल्याने 14 लाख करदात्यांना फायदा होणार आहे.