बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 20 एप्रिल 2020 (13:43 IST)

इन्कमटॅक्स रिटर्नच फॉर्ममध्येही बदल

इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्मभरण्याच्या मुदतीत वाढ केल्यानंतर आता सरकारने त्याच्या फॉर्ममध्ये बदल करणचा निर्णय घेतला आहे. त्यासठीच्या नवीन फॉर्मची माहिती या महिन्याच्या अखेरीस दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय प्रत्क्षय कर विभागाने दिली आहे.

कोरोना व्हायरसच्या या संकटामुळे सरकारने करदात्यांना दिलासा दिला आहे. इन्कम टॅक्स संदर्भातील अनेक कामांसाठी 31 मार्च ही डेडलाइन असते. पण ती यावेळी वाढवून 30 जून करण्यात आली आहे. कोरोनामुळे करदात्यांना रिटर्न भरताना अडचणी येतील, हे लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुदतवाढीची घोषणा केली होती.