शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 एप्रिल 2020 (15:01 IST)

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही

कोविडपासून पसरणार्‍या व्हायरसपासून महाराष्ट्राला नक्कीच वाचवणार परंतू दुहीचा व्हायरस पसरवणार्‍यांना माफ करणार नाही अशा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाइव्हद्वारे दिला. अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही त्यांच्यावर कारवाई होणारच असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला.
 
गमंत किंवा मज्जा म्हणून देखील नोटांना थुंकी लावणारे व्हिडिओ पसवले जात असतील तर या लोकांना माफी नाही. अशा लोकांवर सख्त कारवाईचा इशारा ठाकरे यांनी दिला.
 
या वेळी त्यांनी सोलापुरच्या आराध्याचं विशेष कौतुक केलं. सात वर्षीय या मुलीचा आज वाढदिवस असून तिने दाखवलेला संयम आर्दश असल्याचे ते म्हणाले. या दरम्यान त्यांनी राज्याला मदत देणार्‍यांचे आभार देखील मानले. तसेच व्हायरसच्या विरोधात जात-पात-धर्म-पंथ विसरुन करोनाशी लढा देण्यासाठी एकत्र आल्याचं त्यांनी कौतुक देखील केलं.