शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 1 एप्रिल 2020 (21:33 IST)

रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ मध्ये झळकणार

अभिनेता रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात  तो हॉलिवूड सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थसोबत क्रीन शेअर करणार आहे. सुपरहिरो ‘थॉर’ फेम क्रिस हेम्सवर्थ हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. 
 
रणदीपने इन्स्टाग्रामवर ‘एक्सट्रेक्शन’ने पहिले पोस्टर शेअर करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. हा चित्रपट येत्या २४ एप्रिलला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणदीपसोबतच बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी आणि पंकज त्रिपाठी देखील झळकणार आहेत.
 
‘एक्सट्रेक्शन’ हा एक अॅक्शनपट आहे. हा चित्रपट भारत आणि अमेरिकेच्या सैनिकांवर आधारित आहे. या चित्रपटात रणदीपने भारतीय सैनिकाची तर हेम्सने अमेरिकन सैनिकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण भारतातच झाले आहे. ‘एक्सट्रेक्शन’ची पटकथा ‘अॅव्हेंजर्स’चा दिग्दर्शक जो रुसो याने लिहिली आहे.