शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (11:48 IST)

नेटफ्लिक्स' ची नवीन प्रमोशनल ऑफर, पहिल्या महिन्यात ५ रुपयांत सर्व्हिस

Netflix promotional offer
नेटफ्लिक्स'ने Netflix भारतात नवीन प्रमोशनल ऑफर सुरु केली आहे. यामध्ये  पहिल्या महिन्यात केवळ ५ रुपयांत सर्व्हिस ऑफर करत आहे. 'नेटफ्लिक्स'ची नवीन ५ रुपयांची ऑफर २१ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. 
 
नवीन ऑफरनुसार, 'नेटफ्लिक्स'चे नवे यूजर्स कोणताही प्लान घेऊ शकतात. नवे यूजर्स १९९ रुपयांचा किंवा ७९९ रुपयांचा सर्वात मोठा प्लानही ऑफरमधून सिलेक्ट करु शकतात. ऑफरअंतर्गत यूजर्सना पहिल्या महिन्यासाठी केवळ ५ रुपये भरावे लागणार आहेत. त्यानंतर 'नेटफ्लिक्स'च्या नवीन यूजर्सना दुसऱ्या महिन्यापासून, प्लाननुसार संपूर्ण पैसे भरावे लागणार आहेत. 
 
'नेटफ्लिक्स' लॉन्ग टर्म प्लानही ऑफर करत आहे. कंपनी काही यूजर्सना ३, ६ किंवा १२ महिन्याच्या प्लानवर डिस्काऊंटही देतेय. Netflix लॉन्ग टर्म असणाऱ्या प्लानवर ५० टक्क्यांपर्यंतचा डिस्काऊंट ऑफर करतेय. 'नेटफ्लिक्स'कडून भारतात आधी, यूजर्सना पहिल्या महिन्यासाठी मोफत सर्व्हिस ऑफर करण्यात येत होती. मात्र, सध्या कंपनीने ही ऑफर बंद केली आहे. भारतात 'नेटफ्लिक्स'चा १९९ रुपयांचा सर्वात कमी किंमतीचा प्लान आहे.