1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020 (10:41 IST)

Netflix ची ‘फ्री ट्रायल’ सेवा बंद

Netflix
अमेरिकी ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस Netflix  ने भारतीय ग्राहकांना दणका दिलाय. कंपनीने भारतात दिली जाणारी एक महिन्याची ‘फ्री ट्रायल’ सेवा बंद केली आहे. पण, त्याबदल्यात आता कंपनीने एक नवी योजना आणली आहे.
 
यानुसार ग्राहकांना नेटफ्लिक्सच्या पहिल्या महिन्यासाठी पाच रुपये द्यावे लागतील. मिळालेल्या माहितीनुसार, ही सेवा केवळ नव्या ग्राहकांसाठीच उपलब्ध असेल. जुन्या ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येणार नाही. जे ग्राहक पहिल्यांदा नेटफ्लिक्सवर लॉगइन करतील त्यांच्यासाठी ही सेवा उपलब्ध असेल. सध्या या सेवेची चाचणी सुरू आहे. त्यामुळे सर्व नव्या ग्राहकांना नव्हे तर निवडक नव्या ग्राहकांनाच या सेवेचा पर्याय दिसेल.